Thursday, July 9, 2009

 

नमस्कार,
आपणास साडेसातीचा त्रास असेल तर आपणास लाभदायक ठरेल असा एक मंत्र रोज ऐकण्यासाठी (mp3 File) पाठवली जाईल( 15-07-2009 पुर्वी). हा मंत्र रोज घरात किमान १ तास सकाळी व संध्याकाळी सुरु ठेवावा.यामुळे आपला त्रास नक्कीच कमी होईल. ही योजना पूर्णतः मोफत आहे. माझ्या खात्यात पैस भरू नयेत.
****अटी लागु****
email subject - sadesati
पहिल्या १०८ email लाच उत्तर दिले जाईल.
योजना फक्त दिनांक 15-07-2009 सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरु आहे.
-----------------------------------------------------------------------------------

शनिकृपा

लहान-थोर, गरीब-श्रीमंत प्रत्येकाचे आपल्या समस्यांचा जनक शनि असे ठाम मत झालेले आहे. आजच्या शनैश्चर जयंतीच्या शुभ दिनी हे सार्वत्रिक मत बदलावे या साठी हा लेखन प्रपंच करत आहोत.
मानव आपल्या स्वार्थलोलुप स्वभावधर्मानुसार गैरमार्गाने प्रगतीच्या वाटा पादाक्रांत करत जातो, आणि कर्मफलाचा न्याय निवाडा होताच. शनिला आरोपीच्या पिंज यात उभे केले जाते. आपल्या मनाला विचाराला मानवतावादी दृष्टीकोन प्राप्त व्हावा. आपणास नर का नारायण होण्याची सुवर्णसंधी प्राप्त व्हावी यासाठी शनिमहाराज सदैव प्रयत्नशील असतात. त्यांचा उदात्त हेतु आपण लक्षात घेणे नितांत गरजेचे आहे. शनिकृपेची उत्तम लक्षणे म्हणजे मानवाकडे असणारा सकारात्मक दृष्टीकोन, अभेद्य इच्छाशक्ती, अपयशाची कडूगोळी पचवण्याची मनःशक्ती. आपल्यामध्ये असणारे हे गुण विकसीत करणे हे प्रत्येकाचे प्रधान कर्तव्य आहे. असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी या पुरुषार्थच्युत विचारसरणीचा शनिने निषेध केला आहे, हे विसरून चालणार नाही.

आपणास शनिकृपेस पात्र होण्याची इच्छा असेल तर काय करणे शक्य होईल याचा विचार करू. शनिमहाराज प्रयत्नशील राहण्याचा सल्ला देत असल्याने कोणत्याही क्षणी दैववादाच्या आहारी न जाता, प्रयत्नात सुसूत्रता आणणे हा शनिस अत्याधिक प्रिय उपाय ठरतो. दैवी उपाय ,शनिसेवा करण्याची इच्छा असेल तर आपण सत्यवचनी असणे अत्यावश्यक आहे. शनिकृपेसाठी औषधी स्नान करण्याचे विधान आहे, यासाठी काळे तीळ, काळे उडीद, लवंग, सुगंधीत पुष्प या वस्तु लोखंडी बादलीत पाण्यात भिजवाव्यात व त्या पाण्याने दर शनिवारी स्नान करावे.स्नान करताना ॐ शनैश्चराय नमः। हा मंत्र म्हणावा.
हा उपाय अतिशय सोपा असला तरी त्याचा अनाकलनीय लाभ झाल्याचे अनुभवास आले आहे. आजच्या शनैश्चर जयंतीच्या दिवशी सूर्यास्ताच्या नंतर काळे उडीद, तीळ तेल,काळे उडीद , काळे कापड, लोह पात्र, या वस्तु शनि मंदिरात दान कराणे.

शनिकृपेसाठी आपण नित्य खालील तुलसीदास महाराजकृत रचना रोज १००८ वेळा म्हणण्याची सवय केल्यास उत्तम लाभ होईल.

सुमिरी पवनसुत पावन नामू। अपने बस करि राखे रामू॥

विक्रमादित्य पणशीकर
panshikar999@gmail.com
skype id - vikram.panshikar
9049600622


 

कर्पूरहोम
आपल्या भारतीय संस्कृतीत पंचमहाभूतांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. आपले शरीर पंचमहाभूतांपासून तयार होते. आपल्या उपासना पद्धतीत देखील पंचमहाभुतांचे मानाचे स्थान दिले जाते. आपल्याकडे प्रत्येक मंगल कार्य अग्निसाक्ष करण्याचा शास्त्रसंकेत आहे, म्हणूनच सुग्रीवाला श्रीरामाने संकट्मुक्त करण्याचे आश्वासन अग्निच्या साक्षीने दिले होते. आपले प्रत्येक धार्मिक कार्य हे अग्निच्या साक्षीनेच पूर्ण होते. तेथे अग्निची उपस्थिती निरांजन ते होमकुंडातील धगधगत्या अग्निच्या स्वरूपात असल्याचे आपणास दिसते. कित्येक मंदिरात देवदेवतांचा जत्रा-उत्सव असताना व्रतधारी भक्त अग्निकुंडातून चालत जाऊन देवतेचा उत्सव साजरा करतात, उदा. गोव्यातील श्रीलईराईच्या जत्रेत हा होमकुंडाचा उत्सव पाहण्यासाठी आजही लोकांची तोबा गर्दी होते.

आपण आपल्या दैनंदिन साधनेत अग्निची उपासना केल्यास आपल्या प्रगतीस कोणताही अवरोध निर्माण होऊच शकत नाही असा अनुभव अनेकांना आला आहे. मानवाचे यश धगधगत्या उत्साहावर , कुशल कार्यशक्तीवर , सत्याधिष्ठीत आक्रमकतेवर तसेच अभेद्य मनःसामर्थ्यवर अवलंबून असते, आणि अग्निनारायण या सर्व देवदुर्लभ यशोवर्धक गुणांची खाणच . त्यामुळे आपणास अग्निनारायणाची उपासना प्रगतीचा विस्तार करण्यास दाही दिशा मोकळ्या करते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपणास रोज होमहवन करणे तर शक्य नाही. मग सोप्या पद्धतीने उत्साहमूर्ती अग्निची उपासना कशी करावी हा प्रश्न समोर येतो. त्यासाठी कर्पूरहोम करणे लाभप्रद ठरते. आपल्या घरी देखील हे करणे शक्य आहे. त्यासाठी एक नारळ, कापूर वडी याशिवाय अन्य काही लागत नाही. आपल्या देवघरात देवाकडे नारळाची शेंडी करून नारळ ठेवावा , शुचिर्भूत आसनावर बसावे, नारळावर कापूर वडी ठेऊन प्रज्वलित करावी व आपल्या कुलदेवतेचा किंवा उपास्य देवतेचा मंत्र म्हणावा . मंत्र म्हणणे सुरु ठेवावे. कापूर विझू नये म्हणून प्रत्येक वेळेस नवी वडी ठेवत जावी . आपली अपेक्षीत जप संख्या झाल्यावर नमस्कार करावा. आपणास यामुळे अपेक्षित कार्य़शक्ती प्राप्त होते असा अनुभव आहे. काय करावे अशी अवस्थेत असताना हा प्रयोग कराव. यामुळे निश्चित लाभ होईल.

विक्रमादित्य पणशीकर

This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica