Tuesday, June 21, 2011

 

भरतकृपा

आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असल्याचे आपण पाहतो. त्यातील प्रत्येकासच यशाचे महाव्दार खुले होते असे नाही तर अथक प्रयत्नानंतर स्वीकृत कार्यक्षेत्रात सुयशाचे शिखर गाठणे दुरापास्त होते, असा साधारणपणे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांचा स्वानुभव आहे. आईवडील मुलांना उत्तम शिक्षण देतात, त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या इच्छांची तिलांजली दिली जाते. मुले शिकतात मोठी होतात आपल्या गुणवत्तेनुसार योग्य नोकरीधंदा मिळवण्याचा कर्तव्य करत असताना नानाविविध अडथळे समोर येतात. आजच्या समाजव्यवस्थेत बोकाळलेला भष्टाचार मनास निराशेकडे घेऊन जातो. गुणवंतांना योग्य संधी मिळणे अत्यावश्यक असून तसे झाल्याचे दिसतेच असे नाही. हाच प्रकार लहानसहान धंदाकरणाऱ्यांना अनुभवास येतो. आपल्या गुणांचे चीज व्हावे, श्रमशक्तीचे योग्य मूल्यांकन व्हावे, कर्तृत्त्वसिद्धिस सुसंधी मिळावी ही रास्त इच्छा पूर्ण होण्यात अनेकानेक अडसर येतात , ते दूर कसे करावे ? नक्की काय चुकते? पत्रिकेत ग्रहदोष आहेत का ? हा प्रश्न मनास पोखरत असतो. प्रयत्नवादी माणसाचे होणारे खच्चिकरण रोखण्यासाठी काही दैवी उपाय अतिशय लाभकारक सिद्ध होतात, अर्थात त्यासाठी आपली बाजू सत्याची असणे अत्यावश्यक आहे हे विसरुन चालणार नाही. आता यासाठी सहज करता येण्यासारखा उपाय करणे गरजेचे आहे. ज्यांना आपली उपजीविका उत्तम रितीने चालवायची आहे, आपली कौटुंबिक कर्तव्ये समर्थपणे पार पाडायची आहे, आपले जीवन वैभवसंपन्न करायचे आहे त्यांनी पुढील मंत्र रोज म्हणावा.
बिस्ब भरन पोषन कर जोई।
ताकर नाम भरत अस होई॥
हा मंत्र श्रीभरताचे गौरवगान करणारा आहे. भरताकडे रामकृपेने विश्वाचे भरण पोषण करण्याचे असामान्य सामर्थ्य असल्याचा दाखला या रचनेत आहे. या मंत्राच्या नित्य पठणाने अर्थप्राप्तीचे मार्ग मिळतात हा अनुभव आहे. सतत प्रयास करूनही व्यवसायवृद्धी होत नसेल तर या मंत्र प्रभावाने गिह्राईक वाढल्याचा अनुभव मिळेल. जे रोजंदारीचे काम करतात त्यांना सातत्याने काम मिळण्यास या मंत्राचा फायदा झाल्याचे निदर्शनास आले आहे. आपल्या गुणांच्या बळावर व भरतकृपाछत्राखाली आपल्या प्रगतीचे रोपटे वटवृक्षात रूपांतरीत करणे शक्य होईल.

विक्रमादित्य दाजी पणशीकर
पेडणे – गोवा
९०४९६००६२२
panshikar999@gmail.com

Labels:


This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica